आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: रियल लाइफमध्ये असे राहतात रजनिकांत, लुंगी आणि चप्पल आहे त्यांची फेव्हरेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लिंगा'मध्ये रजनिकांत यांचा लूक आणि रिअल लाइफमध्ये रजनिकांत)
मुंबई- रजनिकांत यांचे चाहत्यांसाठी आजचा दिवस दुहेरी सेलिब्रेशनचा आहे. सेलिब्रेशनच्या पहिले कारण म्हणजे रजनिकांत यांचा बर्थडे आणि दुसरे कारण म्हणजे आज त्यांचा 'लिंगा' सिनेमा रिलीज होत आहे. रजनिकांत 65 वर्षांचे झाले आहेत.
लिंगामधून रजनिकांत तब्बल चार वर्षांनी पडद्यावर झळकणार आहेत. तसे पाहता, रजनिकांत या वर्षी आलेल्या 'कोचडिअन' सिनेमात दिसले होते, परंतु हा एक अॅनिमेशन सिनेमा होता. त्यांचा शेवटा सिनेमा 2010मध्ये आलेला 'अॅथियन' (रोबोट) होता. आतापर्यंतच्या सिनेमांत रजनिकांत बिझनेसमनपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येक भूमिकेत दिसले आहेत. परंतु ख-या आयुष्यात रजनिकांत खूपच साधे-सिंपल राहतात.
लुंगी परिधान करून दिसतात
रजनिकांत यांची लाइफस्टाइल खूपच साधी आहे. सिनेमांत ते चमकधमक भूमिका साकारतात, तसेच ख-या आयुष्यात ते दाक्षिण भारतीय वेशभूषेत दिसतात. रजनिकांत सामान्यरित्या लुंगी आणि शर्ट परिधान करून दिसतात.
सोने घालणेदेखील आवडत नाही
दाक्षिणात्य स्टार्स ब-याचवेळी अंगावर सोने घातलेले दिसतात. मात्र रजनिकांत यांना सोने घालण्याचा शौक नाहीये. साधी चप्पल घालूनसुध्द रजनिकांच सार्वजनिक ठिकाणी दिसतात. त्यांच्या या साध्यापणाच्या स्टाइलने त्यांना लोकप्रियता मिळाली आहे.
धार्मिक आहेत रजनिकांत
रजनिकांत खूपच धार्मिक व्यक्तिमत्व आहे. रजनिकांत यांच्या सकाळची सुरुवात योग आणि मेडिटेशने होते. त्यांना रस्त्याने वॉक करायला आवडतो. रोबोट सिनेमाच्या रिलीजनंतर नजनी हिमालयाची सैर करण्यासाठी गेले होते. तेथील छायाचित्रे त्यांनी शेअर केली होती. या छायाचित्रांत रजनिकांत खूपच साधे दिसले होते. रस्त्यावर जेवण करतानासुध्दा दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रजनिकांत यांची खासगी आयुष्यातील सिंपल लाइफस्टाइलची काही छायाचित्रे...