आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काचेच्या महालात शाहरुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनयात मिळालेल्या ट्रॉफीबरोबरच आयपीएल क्रिकेट तमाशाचा कपदेखील शाहरुख खानच्या घरात सजवण्यात येईल. अभिनयातून कमवलेले धन आणि क्रिकेट तमाशातून झालेल्या कमाईची तुलना केली जाऊ शकत नाही. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शाहरुख जितका वेळ देतो तितकाच वेळ त्याने या क्रिकेटला दिला. या वेळी चित्रपटापेक्षा जास्त ड्रामा आणि अँक्शन क्रिकेट तमाशात झाला. क्रिकेटमध्ये फिक्सिंग होते, पण चित्रपटात होत नाही. स्टेडियममध्ये बसलेल्या जनतेत आणि चित्रपटगृहात बसलेल्या जनतेच्या प्रतिक्रियेत अंतर असते. शाहरुखने मुंबईत स्टेडियममध्ये वाद घातला आणि चेन्नईमध्ये अनुपस्थितीत मुंबईच्या प्रेक्षकांची माफी मागितली.
एकदाचा क्रिकेट तमाशा संपला. आता उच्चभ्रू लोकांची संध्याकाळ उदास झाली असेल पण पुन्हा एखादी नवी मालिका त्यांचा रिकामा वेळ भरून काढेल. शो नेहमी सुरू असतो. वास्तविकतेतून पळ काढण्यासाठी अन्याय आणि असमानतेवर आधारित एखादी परिकथा आवश्यक असते. इतिहासात पुरावे आहेत की राजे-महाराजे आणि हुकूमशहांनी जनतेच्या मनोरंजनासाठी धुंदीत टाकणारे आयोजन केले. बघ्यांनी तर ग्लॅडिएटर्सच्या जीवघेण्या द्वंद्वचादेखील आनंद घेतला. आपल्या मनोरंजनासाठी हत्तीच्या पायाखाली कैद्यांना चिरडणेदेखील काही शक्तिशाली लोकांना चांगले वाटत होते.
असो, या क्रिकेट तमाशात किती लाख किलोवॉट वीज खर्च झाली असेल याची माहिती मिळवण्यासाठी कोणाला अर्ज द्यावा लागेल? क्रिकेटच्या महाराजांनी विजेचे बिल भरले असेल, ते तर सामान्य माणूसदेखील भरतो आणि तरीही रोज भारनियमन सहन करावे लागते. हजारो किलोवॉटच्या प्रकाशात चमचमणारे स्टेडियम आणि त्याच्या थोड्याच अंतरावर अंधारात बुडालेल्या झोपडपट्टय़ा. सध्याच्या अर्थव्यवस्थेत समाज व संस्कृतीची वेगवेगळी ओळख निर्माण झाली आहे. सर्वसुविधा संपन्न पासपोर्ट असलेले आणि सुविधासाठी धडपडणारे विनाओळखपत्राचे असंख्य लोक अशी भारतीय नागरिकांची वेगवेगळी ओळख निर्माण झाली आहे. एका वर्गाजवळ सर्व अधिकार आहेत, तर दुसर्‍याला नेहमी दूर केले जाते.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणार्‍यांचेदेखील एक खासगी आयुष्य असते. अशाच एका जगात शाहरुख खानचा राज्याभिषेक झाला आहे. त्याचा स्वत:चा एक दरबार आहे, त्यात विदूषकांची गर्दी आहे. त्याच्या या खासगी जगात जी-हुजुरी करण्याची परंपरा आहे. याची सुरुवात त्याच्यापासून लाभ मिळवणार्‍यांनी किंवा लाभाची आशा असलेल्यांनी केली आहे. आपल्या चित्रपट आणि राजकारणातील सुपरस्टार्सनी आयन रँडचा ‘द फाउंटेनहेड’ वाचला नसेल, पण त्यांचे वर्तन याचा नायक हॉवर्ड रॉर्कसारखेच आहे. भांडवलशाहीच्या सर्मथक या ग्रंथात प्रतिभावंत आणि सृजन करणार्‍यांवर कोणताच नियम आणि कायदा लागू होत नाही असे म्हटले गेले आहे. त्यांची इच्छाच त्यांचा नियम आहे आणि तो सर्वांवर लागू होतो. सर्वच यशस्वी लोक स्वत:ला प्रतिभावंत आणि सृजक समजतात हे दु:खदायक आहे. यापैकी काही डुप्लीकेट आहेत आणि काही खर्‍या सृजकांच्या सावलीची नक्कल आहेत.
हॅवल्सच्या एका जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे त्यांनी आपल्या अवतीभोवती विजेच्या बल्बाच्या मदतीने वलय निर्माण केले. या वेळी भारतात विलक्षण बुद्धीपेक्षा नकली वलय रचले जात आहेत. अशा कामात माध्यम पारंगत आहे. कलाकारांच्या आनंदी आणि रागीट मुद्रेच्या प्रचारात माध्यमांनी दुहेरी विचार शोधून काढला आहे. मालिका दुहेरी विचारावरच बनतात. मौलिकतेऐवजी दुहेरी विचाराधाराला आज कला मानले जाते. संस्कृती आणि साहित्याच्या इतिहासात हे पहिले कालखंड झाले आहे.
यात शाहरुख खानचा काही दोष नाही. कारण त्याने स्वत: तयार केलेल्या कृत्रिम आभामंडळात त्याला विश्वास होऊ लागला आहे. त्याच्या विचाराच्या चहुबांजूनी आरसे लावण्यात आले आहेत आणि तो त्यात स्वत:ला सर्वत्र पाहत आहे. जरा ‘मुगल-ए-आजम’च्या शीश महालाचे स्मरण करा. जेव्हा त्यातला एखादा आरसा टिचतो किंवा टिचण्याचा भास होतो तेव्हा दु:ख होते.
शाहरूख खान- गौरीत 'ऑल इझ वेल'
झी सिने अवॉर्ड्समध्‍ये शाहरूख- प्रियंकाने आणली रंगत
शाहरूख की फराह कोण करणार बॉक्‍स ऑफिसवर राज्‍य?