आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरफिट आमिर खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खान आपल्या पात्राला जिवंत करण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतो. आता तो आगामी ‘धूम 3’ चित्रपटासाठी स्वत:चा मेकओव्हर करत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. यात त्याचे पात्र सडपातळ आहे, त्यासाठी तो स्ट्रिक्ट डाइट पाळत आहे.

'गजनी' चित्रपटासाठी आमिरने वजन वाढवले होते आणि शरीरयष्टीही बनवली होती. नंतर ‘3 इडियट्स’मध्ये त्याला कॉलेज तरुण दाखवायचे होते. आता या चित्रपटासाठी त्याला सडपातळ व्हायचे आहे. म्हणून तो कमी आहार घेत आहे. यासाठी त्याने आपल्या डॉक्टरांकडून डायट चार्ट बनवून घेतला आहे आणि तो त्याच नियमांना फॉलो करत आहे. यावर तो म्हणतो की, एक बॉडी टाइप सोडून दुस-या शरीराचा शेप तयार करणे फार अवघड काम आहे; पण ठरवले तर हे कामही कठीण नाही.

चित्रपटाच्या एका सूत्रानुसार, या चित्रपटात आमिर एका जिमनॅस्टच्या भूमिकेत आहे. त्यामुळे त्याच्या शरीरात लवचीकता असणे गरजेचे आहे. मसल्सदेखील टोन्ड असायला हवेत. हे काम खूप अवघड आहे; पण आमिर असल्यामुळे काही टेन्शन नाही. त्याला परफेक्शनिस्ट असेच म्हणत नाहीत. मिस्टर परफेक्शनिस्टच्या उपाधीविषयी आमिर म्हणतो, मी तर प्रामाणिकपणे माझे काम करत असतो. प्रेमाने लोक मला जे म्हणतात, ते मी स्वीकार करतो. टीव्ही शो असो की, चित्रपट मला फक्त शंभर टक्के चांगले काम करायचे असते. प्रेक्षकांनी मला हा टॅग दिला, त्याबद्दल मी आभारी आहे.
सत्यमेव जयतेचा परिणाम : आमिर खानची सरकारबरोबर २०० कोटींची डील ?
यांच्या मुठीत अमिताभ, आमिर, शाहरुख
जेनेरिक औषधींसाठी आमिर खानची संसद वारी
आमिर खान राज्यसभेत खासदारांसमोर करणार डॉक्टरांचे 'पोस्टमार्टम'