आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstar Rajinikanth Starrer Lingaa Trailer Released

Trailer: 'लिंगा'मध्ये रजनीकांत यांची दमदार अ‍ॅक्शन, सोनाक्षी बनली 'गाव की गोरी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लिंगा'चा ट्रेलर)
मुंबई- दाक्षिणात्यचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी 'लिंगा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर रजनीकांत यांच्या इतर सिनेमांप्रमाणेच त्यांचा सिनेमादेखील यूनिक स्टाइल, दमदार अॅक्शन आणि त्यांच्या लार्जर दॅन लाइफ पात्रांची झलक दाखवणारा आहे.
सिनेमामध्ये रजनीकांत दुहेरी भूमिके दिसणार आहेत. या सिनेमात सोनाक्षी सिन्हासुध्दा दिसणार आहे. ट्रेलरमध्ये सोनाक्षीचा लूक गांवातील तरुणींप्रमाणे दिसत आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक बांध बनवताना दाखवले आहे. शिवाय रजनीकांत यांची एक भूमिका उद्योगपतीच्या व्यक्तिरेखेने प्रेरित आहे तर दुसरी गावठी मुलाप्रमाणे आहे.
सिनेमात जगपती बापू आणि अनुष्का शेट्टी यांचीसुध्दा मुख्य भूमिका आहे. सिनेमात ए.आर रहमानने संगीत दिले असून 12 डिसेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
दुस-या स्लाइडमध्ये पाहा 'लिंगा'चा ट्रेलर आणि इतर स्लाइड्सवर छायाचित्रे...