आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माने मराठी आणि कर्माने तामिळी आहेत मेगास्टार रजनीकांत, पाहा त्यांचे RARE PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रजनीकांत यांची दुर्मिळ छायाचित्रे)

हिंदी सिनेमेही ज्यांच्या स्टाईलची कॉपी करतात, ज्यांचे सिनेमे बॉलिवूडच्या सिनेमांपेक्षाही बिग बजेट आणि कोट्यवधींची कमाई करतात, आणि जे दक्षिण भारतातल्या फॅन्ससाठी देवासमान आहे... अशा रजनीकांत यांनी नुकतीच फिल्मी इंडस्ट्रीतील आपल्या करिअरची यशस्वी 40 वर्षे पूर्ण केली आहेत.
रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांचे चाहते आहेत. 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होते.
साउथ फिल्म इंडस्ट्रीतल्या या सुपरस्टारने 'अंधा कानून' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हिंदी सिनेमात रजनी यांचा पाहिजे तसा करिष्मा चाललाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यानी आपले लक्ष्य दाक्षिणात्य सिनेमांवर केंद्रीत केले. तीन वर्षांपूर्वी आलेल्या 'शिवाजी, द बॉस' आणि 'रोबोट' या दोन्ही सिनेमांतून हिंदी चाहत्यांनीही रजनीकांतला डोक्यावर घेतले. आणि ते केवळ साऊथचेच नाही तर संपूर्ण भारताचे सुपरस्टार असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
2007 साली रिलीज झालेल्या 'शिवाजी' या सिनेमासाठी रजनी यांना तब्बल 26 कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. आशियात जॅकी चॅननंतर एवढे मोठे मानधन मिळवणारे रजनीकांत एकमेव आहेत. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा इंग्लड आणि साऊथ आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणा-या टॉप 10 सिनेमांपैकी एक होता. रजनीकांत यांनी आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावी केला. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पूरस्कारानेही सन्मानित केले आहे.
रजनीकांत यांनी फिल्म इंडस्ट्रीत 40 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांची दुर्मिळ छायचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच कधी त्यांच्या चाहत्यांच्या बघण्यात आली असावीत.