'मिस्टर जो भी करवा लो', 'शोले 3D'यासारख्या सिनेमांपासून 2014 या वर्षाची सुरूवात झाली. जानेवारीत प्रदर्शित झालेला सुपरस्टार
सलमान खानचा 'जय हो' हा सिनेमा सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाने 111 कोटींचा व्यवसाय केला. बघता बघता ह्या वर्षाचे सहा महिने पूर्ण झाले. अजून यावर्षी सलमान आणि अक्षय या दोघांना सोडून इतर कोणत्याच मोठ्या स्टार्सचा सिनेमा प्रदर्शित झाला नाहीये.
वर्षाच्या सेकंड हाफची सुरूवात 'किक' या सिनेमाने होणार आहे. यानंतर
शाहरुख खान, आमिर खान,
अक्षय कुमार,
रणबीर कपूर, अजय देवगण आणि हृतिक रोशनसारख्या सुपरस्टार्सचे सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अशात या स्टार्समध्ये 'कोटी क्लब'ची फाईट पाहायला मिळणार आहे. बऱ्याचशा सुपरस्टार्सचे सिनेमे सणासुदीच्या काळात प्रदर्शित होणार आहेत. आता यापैकी किती सिनेमे चालतील, हे तर प्रदर्शनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यांतच लक्षात येईल, परंतू यानिमित्ताने प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांना पाहायची संधी मिळेल.
रिलीजिंग डेट आणि क्लॅश फॅक्टर
आमिर खानचा 'पीके' आणि रणबीर कपूरचा 'बॉम्बे वेलवेट'च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. दोन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख जवळजवळ असल्यामुळे त्यांच्यात क्लॅश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही सिनेमे ख्रिसमच्या आसपास रिलीज होतील. दुसरीकडे रोहीत शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा 'सिंघम रिटर्न्स' आणि 'बँग बँग' या सिनेमांच्या प्रदर्शनाची तारिख क्लॅश होत आहे. हे दोन्ही सिनेमे 2 ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
100 कोटी की त्यापेक्षा जास्तची लढत
यावर्षी सलमान खानचा 'जय हो', अर्जुन-आलियाचा '2 स्टेटस्' आणि अक्षय कुमारचा 'हॉलिडे- अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी', फक्त या तीन सिनेमांना 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळू शकले आहे. जर यात जर बॉलिवूडच्या जवळपास सगळ्याच स्टार्सचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत, तर आता केवळ 100 कोटी नाही तर त्यापेक्षा जास्तचा व्यवसाय करण्याची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणुन घ्या, वर्षाच्या सेकंड हाफमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार्सच्या सिनेमांबद्दल...