(दिग्दर्शिका-निर्माती फराह खान आणि सोनू सुद)
मुंबई: या दिवाळी निमित्त रुपेरी पडद्यावर
शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इअर' रिलीज होत आहे. त्यामुळे टीमची स्टार-कास्ट सिनेमाच्या प्रमोशनसाठी मेहनत घेत आहे. रविवारी (12 ऑक्टोबर) सिनेमाचे सर्व स्टार्स अहमदाबादसाठी रवाना झाले.
यावेळी सिनेमाची दिग्दर्शिका फराह खानसोबत
शाहरुख खान, दीपिका पदुकोण, बोमण ईराणी, सोनू सुद, गायिका कनिका कपूर आणि प्रसून जोशीसुध्दा दिसले. विशेष म्हणजे, सोनू सुद बाइकवर आला. दुसरीकडे, विवान शाह टॅक्सीने एअरपोर्टवर पोहोचला. यावेळी दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली. तिने ब्लॅक पर्स हातात पकडलेली होती. शाहरुख आणि दीपिकाने चाहत्यांना हॅलो करून अभिवादन केले. फराह खानने डोळ्यांवर दोन चश्मे लावलेले होते. तिने स्पाइकसोबत गॉगलसुध्दा लावला होता.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्टार-कास्टने 5 ऑक्टोबरपर्यंत जगभरात 'SLAM! The Tour' केला होता. हा सिनेमा येत्या 24 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर पोहोचलेल्या स्टार-कास्टची छायाचित्रे...