(बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला)
मुंबई - 'हेट स्टोरी 2' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेत्री सुरवीन चावलाचा पुन्हा एकदा बोल्ड अवतार चाहत्यांना बघायला मिळणार आहे. आगामी 'क्रिएचर 3डी' या सिनेमातील एक प्रमोशनल गाणे सुरवीनवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात तिने भरपूर अंगप्रदर्शन केले आहे.
आपल्या पहिल्याच सिनेमाद्वारे स्वतःची बोल्ड इमेज तयार करणारी सुरवीन या गाण्यात अभिनेता रजनीश दुग्गलसह दिसत आहे.
'सावन आया...' हे शब्द असलेले गाणे अलीकडेच शूट करण्यात आले आहे. या गाण्यात सुरवीन आणि रजनीश इंटीमेट होताना दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'सावन आया...' या गाण्यातून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे आणि सोबतच पाहा गाण्याचा व्हिडिओ...