आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surveen, Jay And Sushant At Sets Of Hate Story 2

'हेट स्टोरी 2'च्या स्टारकास्टनी शुटिंगदरम्यान केली धमाल, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हेट स्टोरी 2'च्या शुटिंगवेळी अभिनेता जय भानुशाली, अभिनेत्री सुरवीन चावला आणि अभिनेता सुशांत सिंह
मुंबई: टीव्ही अभिनेता जय भानुशाली त्याच्या पदार्पणाच्या 'हेट स्टोरी 2' सिनेमाविषयी खूपच उत्साही असल्याचे दिसत आहे. सिनेमाचे शुटिंग संपल्यानंतर लगेच हे स्टार्स प्रमोशनमध्ये व्यस्त झाले आहेत. सिनेमात त्याच्यासह सुरवीन चावलासुध्दा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. एक मुख्य अभिनेत्री म्हणून तिचाहा पहिलाच सिनेमा आहे.
या दोन्ही सेलेब्सने काल (6 जुलै) मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. ही पत्रकार परिषद आयनॉक्समध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोघांनी सिनेमाशी निगडीत काही रंजक गोष्टी शेअर केल्या. हा सिनेमा 'हेट स्टोरी'चा सीक्वल असून 18 जुलैला रिलीज होणार आहे.
सिनेमामध्ये या दोघांसह अभिनेता सुशांत सिंहसुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेलेब्सनी काही छायाचित्रे क्लिक केली आहेत. या छायाचित्रात स्पष्ट दिसून येते, की हे स्टार्स शुटिंगदरम्यान खूप धमाल-मस्ती करतात. सिनेमाचे दिग्दर्शन विशाल पांड्याने केले असून भूषण कुमार आणि विक्रम भट्ट यांनी मिळून निर्मिती केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा पत्रकार परिषदेत 'हेट स्टोरी 2'च्या शुटिंगदरम्यानची स्टार्सची छायाचित्रे...