आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : ग्लॅमरस खलनायकाच्या भूमिकेत सुशांत शेलार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खलनायक म्हटलं, की डोळ्यांसमोर येतो एक राकट चेहरा... क्रुरता, अन्याय, हाणामारी, दहशत यामुळे त्याची वाटणारी भीती त्याच्या अभिनयाने अधिक खरीखुरी भासू लागते. सिनेमांमध्ये अभिनेता-अभिनेत्रींच्यामध्ये लुडबुडणारा, सर्वसामान्यांना त्रास देणारा खलनायक अनेक प्रेक्षकांच्या डोक्यात जातो. पण आता हे चित्र बदलतेय. स्टाइल, डायलॉगबाजी आणि चकाचक ग्लॅमरमुळे नायकासोबत खलनायकाचा चेहरा बदलतोय. प्रेक्षकांमध्ये आता खलनायकसुद्धा तितकाच लोकप्रिय होतोय. हिंदी सिनेमाप्रमाणे मराठी सिनेमाचा खलनायक देखील आता अधिकाधिक ग्लॅमरस होऊ लागलाय. आगामी आर. विराज दिग्दर्शित 'संघर्ष' सिनेमातून ग्लॅमरस लूक असलेला 'रघू' हा खलनायक प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेता सुशांत शेलारने या निगेटीव्ह भूमिकेत रंग भरले आहेत.
'वंशवेल'मधला डॉ. दिनेश, 'दुनियादारा'तला प्रीतम अशा आजवर त्याने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांपेक्षा संघर्षमधील ही व्यक्तिरेखा वेगळी ठरणार आहे. कारण अंडरवर्ल्ड डॉन रघूभाईच्या या व्यक्तिरेखेला असंख्य निगेटीव्ह शेड आहेत. हा खलनायक एका क्षणी खूप क्रूर आहे, तर दुस-या क्षणी शांत. त्याची क्रुरता दाखवण्याची पद्धत निराळी आहे. सिनेमाची नायिका त्याला आवडते, परंतु तिचे दुस-या कुणावर प्रेम आहे. वेळप्रसंगी तिच्याशी तो प्रेमाने वागतो, तर कधी तिलाच मारतो.
पुढे वाचा, आपल्या या भूमिकेविषयी काय म्हणाला सुशांत...