(फोटो- अॅक्ट्रेस स्वास्तिका मुखर्जी)
मुंबई- प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी हिला विदेशात चोरी करताना पकडण्यात आले आहे. बॉयफ्रेंड सुमन मुखर्जी याच्यासोबत ती सिंगापुरमध्ये एका ज्वेलरी स्टोअरच्या लॉंचिंग इव्हेंटमध्ये सामिल झाली होती. सुमनला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इअररिंग्जचा सेट जो सुमारे 255 डॉलरचा (15 हजार 658 रुपयांचा) होता तो सापडत नव्हता. याप्रकरणी स्टोअरच्या मालकिण अस्पारा ओसवाल यांनी स्वास्तिकावर आरोप केला होता. त्यानंतर ओसवाल यांनी इव्हेंटच्या आयोजकांना सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास सांगितले. यात स्वास्तिका चोरी करताना दिसून येत आहे. याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळाले आहेत.
यासंदर्भात अरिंदम जे सुजॉय घोष यांच्या 'कहानी' चित्रपटात एक्झिकेटिव्ह प्रोड्युसर होते म्हणाले, की मी सिंगापुरमध्ये होतो. मी सीसीटीव्ही फुटेज बघितले आहे. ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे.
स्वास्तिकाने अनेक प्रसिद्ध बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुशांतसिंह राजपूत याच्यासोबत ती 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती.
पुढील स्लाईडवर बघा, स्वास्तिका मुखर्जीचे फोटो....