आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput Oth Launching Of 2nd Trailer Of Detective Byomkesh Bakshy

'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी'च्या ट्रेलर लाँचिंगमध्ये अशा अंदाजात दिसला सुशांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुशांत सिंह राजपूत 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी'च्या ट्रेलर लाँचिंगवेळी)
मुंबई- सोमावारी (9 मार्च) 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी' या आगामी सिनेमाच्या दुस-या ट्रेलर लाँचिंगवेळी सुशांत सिंह राजपूत सिनेमाच्या पात्राच्या रुपात दिसला. यावेळी त्याने आपल्या पात्राप्रमाणे धोती-कुर्ता, जॅकेट आणि त्यावर कोट परिधान केलेला होता. एवढेच नव्हे तर इव्हेंटदरम्यान तो सिनेमात दाखवण्यात आलेल्या व्हिंटेजवर स्वार होऊल आला होता. त्याच्यासह सिनेमाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीसुध्दा लाँचिंग इव्हेंटमध्ये उपस्थित होते.
बंगाली अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी, दिव्या मेनन, आनंद तिवारी आणि म्यांग चांगनेसुध्दा सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 1931-1970 या दशकातील लोकप्रिय झालेल्या काल्पनिक डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शीच्या जीवनपटावर आधारित हा सिनेमा 3 एप्रिल रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या दुस-या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सुशांत आणि दिबाकर बॅनर्जीची छायाचित्रे...