आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput Starts Prepping For Paani...Goes From 1940s To 2050

\'शुल्लक यशापेक्षा अपयशी होऊन मरण पत्करणे पसंत करेल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केवळ तीन सिनेमे पाठीशी असलेला अभिनेता सुशात सिंह राजपूतने आपल्या आगामी सिनेमांमध्ये आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आहेत. त्याचे आगामी दोन सिनेमे पीरियड ड्रामा आहेत. पहिला सिनेमा हा दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश' आहे, तर दुसरा सिनेमा हा शेखर कपूरचा 'पानी' आहे. पहिल्या सिनेमात सुशांत 1940च्या कोलकतामधील गुप्तहेराच्या भूमिकेत आहे, तर दुस-या सिनेमात तो 2050 च्या मुंबईतील एका झोपडीत राहणा-या युवकाच्या भूमिकेत आहे.
या दोन्ही भूमिका करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असून त्याचा आनंदाने स्वीकार केल्याचे सुशांत सांगतो. भूमिकांविषयी तो म्हणाला, "मी पहिल्या सिनेमातून दुस-या सिनेमामध्ये 110 वर्षांची उडी घ्यायला तयार आहे. ब्योमकेशसाठी मला गतकाळात जावे लागले. यासाठी माझ्याकडे संदर्भासाठी अनेक गोष्टी होत्या. त्याकाळातील मी अनेक सिनेमे पाहिले. याशिवाय मला दिबाकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तर 'पानी'साठी माझ्याकडे संदर्भ बिंदू नव्हते. यामध्ये भूमिकेसाठी मला हवी तशी सूट मिळाली होती. रिहर्सल आणि वर्कशॉपदरम्यान शेखर यांनी मला भूमिकेचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. शेखर यांच्या मदतीने मी माझी भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय."
आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये सुशांतने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वठवल्या आहेत. 'काय पो छे'मध्ये क्रिकेटर बनला. 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये मनमौजी तरुण साकारला. तर 'पीके'तील भूमिकासुद्धा हटके आहे.
सुशांत म्हणतो, ''डिझायनर कपडे परिधान करुन हिरोईनसह रोमान्स करणे माझ्यासाठी खूप सोपे काम आहे. मात्र एकाच पठडीतील भूमिका साकारणे मला पसंत नाही. यापेक्षा आव्हानात्मक भूमिका साकारुन अपयशी होणे मला पसंत पडेल. शुल्लक यश मिळवण्यापेक्षा अपयशी होऊन मी मरण पत्करेल.''