(छायाचित्रेः अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बालपणीची छायाचित्रे)
काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स,
पीके या गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज
आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. 21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेल्या सुशांतने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर 'काय पो छे' या सिनेमाद्वारे त्याने मोठ्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला.
'पवित्र रिश्ता' या मालिकेतील त्याची को-स्टार अंकिता लोखंडेसोबत तो रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचे समजते.
सुशांतच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा बालपणी कसा दिसायचा बॉलिवूडचा हा हॅण्डसम हीरो...