आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडपासून ते बिझनेसमनपर्यंत, तब्बल 9 जणांसोबत होते सुश्मिता सेनचे अफेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - सुश्मिता सेन आणि विक्रम भट्ट)
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने बुधवारी (20 ऑगस्ट 1976) आपला 38वा वाढदिवस साजरा केला. रणदीपचे एकेकाळी माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनसोबत अफेअर होते. मात्र काही दिवसांतच या दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. सुश्मितासह ब्रेकअप झाल्यानंतर माझे आयुष्यच पालटले, असे रणदीप सांगतो.
सुश्मिता सेन बी टाऊनची अशी एक अभिनेत्री आहे, जी नेहमी आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. आत्तापर्यंच तिचे नाव जवळजवळ आठ ते नऊ पुरुषांसोबत जुळले आहे. यापैकी काही बॉलिवूडमधील आहे, तर काही जण बिझनेसमन आहेत. यापैकीच एक म्हणजे रणदीप हुड्डा. मात्र सुश्मिताच्या आयुष्यात सर्वप्रथम एन्ट्री झाली होती ती दिग्दर्शक-लेखक विक्रम भट्टची.
पहिले बॉयफ्रेंड होते विक्रम भट्ट..
विक्रम भट्ट आणि सुश्मिता सेनच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली. विक्रमने सुश्मितासाठी स्वतःच्या पत्नीला घटस्फोट दिला आणि तिच्याबरोबर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र दोघांची सोबत फार कमी काळ टिकली. विक्रम विवाहित असून ते एका मुलीचे (कृष्णा) वडीलसुद्धा आहेत. विक्रमची पत्नी अदितीला सुश्मिताबरोबरच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर सुश्मिता आणि विक्रमचे ब्रेकअप झाले.
विक्रम भट्टसह ब्रेकअप झाल्यानंतर सुश्मिताचे अनेक पुरुषांसह लिंकअप झाले होते... या सगळ्या अफेअर्सबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...