आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माशा अल्लाह बहुत खुबसुरत होगी मेरी शादी\' असं म्हणणारी सुश आहे फन लव्हिंग, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 नोव्हेंबर 1975 रोजी बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सुश्मिता सेनला आता लग्नाचे वेध लागल्याचे समजते. 38 वर्षांच्या सुष्मिताने लवकरच बोहल्यावर चढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लग्न न करताच दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचा आईप्रमाणे सांभाळ करणाऱ्या सुश्मिताने आपली सामाजिक जबाबदारी सांभाळली.
आता आपल्या दोन्ही मुलींना वडिलांचेही प्रेम मिळावे असे तिला वाटत आहे. म्हणूनच “माशा अल्लाह बहुत खुबसुरत होगी मेरी शादी” असे म्हणत सुश्मितानेही आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे. आता सुश्मिता आपल्या जोडीदाराची चाहत्यांशी कधी भेट घालवून देणार, याचीच उत्सुकता आहे.
असो, आपल्या दोन मुलींना आईप्रमाणे जपणारी सुश्मिता खासगी आयुष्यात फन लव्हिंग आहे. आनंदाने आयुष्य जगण्यावर तिचा विश्वास आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सुश्मिताची अशीच काही फन लव्हिंग छायाचित्रे दाखवत आहोत.