आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sussanne Drank 6 Glasses Of Wine In Front Of Her Family?

दुबईत रंगली पार्टी, कुटुंबीयांसमोर 6 ग्लास वाइन प्यायली सुझान?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी 24 मार्चला शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि हृतिक रोशनची पत्नी सुझान रोशन दुबईमध्ये एकत्र दिसल्या. दोघी इथे 'नाइरा' रिअल स्टेट प्रोजेक्टच्या लाँचिंगसाठी पोहोचल्या होत्या. या नवीन प्रोजेक्टच्या लाँचिंगमध्ये सुझानचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
तसे पाहता सुझान आणि गौरी दोघी नवीन प्रोजेक्टवर एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या आधीच संमोर आलेल्या आहेत. परंतु त्यांना दोघींना सोबत बघितल्यानंतर ही गोष्टी सिध्द झाली.
सुझान आणि गौरीने दुबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्या आपली मैत्रीण रेखी तौरानीच्या घरी आयोजन केलेल्या शानदार पार्टीत सामील झाल्या.
पार्टीनंतर दोघींनी रात्री बीच रेस्तरॉ आणि लाउंजमध्ये खूप एन्जॉय केला. दुबईमध्ये समुद्रकिनारी पार्टीचा आनंद घेताना दोघी खूप आकर्षक दिसत होत्या. दुस-या दिवशी सुझानला कुटुंबीयांसोबतसुध्दा एन्जॉय करताना बघितल्या गेले.
एका प्रसिध्द वर्तमानपत्रच्या बातमीनुसार, पार्टीमध्ये सुझान एक किंवा दोन ग्लास नव्हे तर चक्क 6 ग्लास वाइन प्यायली. सुझानने वाइन पिणे ही कोणती मोठी गोष्ट नाही. परंतु ती चक्क आपल्या कुटुंबीयांसमोर वाइन प्यायली, ही आश्चर्याची गोष्ट होती. हृतिक रोशनपासून विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदा सुझानला इतके आनंदी बघितल्या गेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा पार्टीची काही खास छायाचित्रे...