आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकपासून विभक्त होताच सुझानने बदलले आडनाव, नावापुढे \'रोशन\' नव्हे \'खान\' लावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुझान खान आणि तिच्या मुंबईमधील फर्नीचर स्टोअरच्या बाहेर लागलेली नेमप्लेटचे छायाचित्र)
सुझानला पती हृतिक रोशनपासून विभक्त होण्याची पूर्ण इच्छा आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या अर्जावर केस चालू आहे. मागील दिवसांत बातमी आली होती, की सुझानने तिच्या नावातून रोशन काढून खान लावले. मात्र याविषयी सविस्तर माहिती मिळालेली नव्हती. मात्र एका छायाचित्राच्या माध्यमातून हे स्पष्ट झाले आहे.
वरील छायाचित्रात चौथ्या नंबरवर सुझानचे पूर्ण नाव दिसत आहे. त्यामध्ये तिचे आडनाव रोशन नव्हे खान दिसत आहे. ही नेमप्लेट सुझानच्या मुंबईमधील फर्नीचर स्टोअरची आहे. सुझानचा हा चारकोट प्रोजेक्ट मुंबईच्या अंधेरीतील आहेत. वरील छायाचित्रात स्पष्ट दिसून येतेय, की सुझानने रोशन आडनाव काढून खान लावले आहे.
बातमी अशीही आहे, की नेमप्लेटच नव्हे तर सुझानने इतर महत्वाच्या कागदपत्रांवरही खान आडनाव केले आहे. मात्र, मुलांच्या नावापुढे ती रोशनच लावले. कोर्टाची प्रक्रियेनुसार, हृतिक आणि सुझानचा घटस्फोट या वर्षी ऑक्टोबरमध्ये होऊ शकतो.
या नेमप्लेटने आणखी एक बातमी समोर आली आहे, की सुझान आणि गौरी खान यांच्यातील पार्टनरशिप संपुष्टात आली आहे. कारण स्टोअरच्या बाहेर लावलेल्या नेमप्लेटवर सुझानसह गौरी खानचे नाव होते. मात्र ते आता दिसत नाहीये. पण या प्रोजेक्टमधून गौरी खानला काढण्यात आल्याची आधिकारिकरित्या कोणतीही माहिती नाहीये. गौरी आणि सुझान 2012पासून या प्रॉडेक्टमध्ये पार्टनर होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुझान आणि गौरी खानची छायाचित्रे...