आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sussanne Roshan Teams Up With Fashion School 'Pearl Academy'

जाणून घ्या, विभक्त झाल्यानंतर काय करत आहेत हृतिक-सुझान?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटेरिअर डिझाइनर आणि चारकोल प्रोजेक्टची संस्थापक सुझान रोशनने 15 एप्रिलला मुंबईमध्ये नवीन 'पर्ल अ‍ॅकॅडमी' परिसराच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. सुझानच्या चारकोल प्रोजेक्टच्या साहाय्याने 'पर्ल अ‍ॅकॅडमी'च्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी आणि चांगल्या करिअरसाठी शिष्यवृत्ती प्राप्त करून दिली जाणार आहे.
सुझान रोशनचे म्हणणे आहे, की 'हे मुंबईसाठी खूपच रंजक आहे, की 'पर्ल अ‍ॅकॅडमी' शहरात येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये ही अ‍ॅकॅडमी रचनात्मक उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्यास मदत करेल. माझ्या मते, आमच्या सहभागाने देशभर या डिझाइनरला प्रोत्साहन देण्यास मदत मिळणार आहे. ही एक चांगली संधी आहे, की 'पर्ल अ‍ॅकॅडमी'व्दारा विद्यार्थ्यांना पुढे संधी उपलब्ध करून देण्याची बातचीत केली जात आहे. मी याचा एक भाग बनून खूप आनंदी आहे.'
सुझान हृतिकपासून विभक्त झाल्यानंतर स्वत: सक्षम बनवत आहे आणि कामात मन गुतंवून ठेवत आहे. सुझान दोन मुलांची आई आहे म्हणून कदाचित तिला इतर मुलांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. तिने केलेल्या या 'पर्ल अ‍ॅकॅडमी'ची घोषणा खरंच स्तुती करण्यासारखी आहे.
पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचलेली सुझान खूपच आकर्षक दिसत होती. हृतिकपासून वेगळी झाल्यानंतर तिने एक नवीन टॅटूसुध्दा गोंदवून घेतला.
सध्या काय करत आहे हृतिक?
सुझान आपल्या कामात व्यस्त आहे. तसचे हृतिक, कॅतरिना कैफसोबत आपल्या 'बँग बँग' या आमागी सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. त्याने 'बँग बँग'साठी एक गाणे चित्रीत केले आहे आणि या गाण्यासाठी त्याने सतत 12 तास शुटिंग केली. हृतिकने टि्वटरवर लिहीले, 'बँग बँग'च्या एका गाण्यासाठी पूर्ण 12 तास सतत डान् करत होतो. माझ्या करिअरमधील हे आवडत्या गाण्यापैकी एक आहे. विशाल-शेखर, बोस्को सीझरआणि सिद यांचे मी आभार मानतो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सुझानच्या 'पर्ल अ‍ॅकॅडमी' परिसराच्या शुभारंभाची काही छायाचित्रे...