(डावीकडून- अर्जुन रामपाल, डायरेक्टर अभिषेक कपूरसह सुझान आणि मेहर रामपाल)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पत्नी सुझानपासून विभक्त झाला आहे. त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याला अभिनेता अर्जुन रामपाल जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. हृतिक आणि सुझान अद्याप कायदेशीररित्या विभक्त झालेले नाहीत. मात्र त्याच्यापासून दूर गेल्यानंतर आता सुझान अर्जुनसह अनेकदा दिसू लागली आहे. बुधवारी रात्रीसुद्धा सुझान अर्जुन कपूरसह दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती.
या पार्टीत अर्जुनसह त्याची पत्नी मेहरसुद्धा सहभागी झाली होती. सुझान ब्लॅक स्लिव्हलेस टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसली. यांच्याव्यतिरिक्त अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. चंकी पांडेसुद्धा आपल्या पत्नीसह पार्टीत सामील झाला. याशिवाय अभिनेत्री अमृता पुरी, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, अरबाज खानसुद्धा पार्टी एन्जॉय करताना दिसले. बॉलिवूड सेलेब्ससह क्रिकेटर्स
युवराज सिंग आणि जहीर खान पार्टीत पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिषेक कपूरच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...