आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'व्हॅलेंटाइन डे' च्या पर्वावर स्वप्निल बांदोडकरांचा नवा अल्बम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' या म्युझिक कंपनीची निर्मिती असलेला आणि स्वप्निल बांदोडकरच्या सुमधुर स्वरांनी सजलेला 'तुझ्याच आसपास मी' हा म्युझिक अल्बम नुकताच लाँच करण्यात आला. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात संगीत प्रेमींच्या उपस्थितीत हा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी मेघे समूहाच्या विश्वस्त शालिनी ताई मेघे, माजी आमदार सागर मेघे, गीतकार संजय इंगळे तिगावकर, संगीतकार अजय हेडाऊ, ख्यातनाम गायक अनिल खोब्रागडे, गायिका मधुरा कुळकर्णी यांच्यासह बरीच मंडळी उपस्थित होती.
गीतकार संजय इंगळे तिगावकर यांच्या समर्पक आणि हृदयस्पर्शी शब्दांना अजय हेडाऊ यांच्या दर्जेदार संगीत नियोजनाने श्रवनीय केले असून नव्या पिढीचा लाडका गायक स्वप्निल बांदोडकरसह अनिल खोब्रागडे आणि मधुरा कुळकर्णी यांनी अल्बममधील गाणी स्वरबद्ध केली आहेत.
'व्हेलेंटाइन डे' च्या पर्वावर दाखल झालेल्या या अल्बमचे नामकरण गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी केले असून युनिव्हर्सलचे विभागीय व्यवस्थापक राजन प्रभू यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे. या समारोहात अनिल खोब्रागडे, मधुरा कुळकर्णी आणि अजय हेडाऊ यांनी गीतरचना सादर करून रसिकांची उस्फूर्त दाद मिळविली.