आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swapnil Joshi And Mukta Barve In Mangalashtaka Once More

स्वप्नील-मुक्ता म्हणतायेत 'मंगलाष्टकं वन्स मोअर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' हा सिनेमा आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतून ही जोडी सगळ्यांच्याच पसंतीला पडली होती. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण 'मंगलाष्टकं वन्स मोअर' या सिनेमातून स्वप्नील आणि मुक्ता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या त्यांच्या या आगामी सिनेमाचे शूटिंग पुण्यात सुरु आहे.

प्रेमासाठी वाहून घेतलेल्या लाजाळू आणि स्वतःच मत असलेल्या मुलीची भूमिका मुक्ता या सिनेमात साकारत आहे, तर स्वप्नील जोशी आजच्या पिढीच्या, आधुनिक विचारांच्या टेक्नोसॅव्ही तरूणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिजीत आणि आरती ही त्यांच्या पात्राची नावे आहेत. नाती तुटायला लागली म्हणून फेकू नका ती नव्यानं अपडेट करा, अशी या सिनेमाची थीम आहे.

तेलगु सुपरस्टार पवन कल्याण यांच्या पत्नी रेणू देसाई या सिनेमाच्या निर्मात्या आहेत. स्वप्नील आणि मुक्तासह हेमंत ढोमे सई ताम्हणकर आणि कादंबरी कदम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. स्वप्नील आणि मुक्ता या हीट जोडीचा 'मंगलाष्टकं वन्स मोअर' हा नवा सिनेमा येत्या 26 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.