आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swara Bhaskar Talking About Machhli Jal Ki Rani Hai

भित्री असूनही स्वराने केला हॉरर सिनेमा? जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मछली जल की रानी'च्या रुपात करिअरमधील पहिला हॉरर सिनेमा केल्यानंतर स्वरा भास्करने आता हॉरर सिनेमामधून पाय मागे घेतला आहे.
आनंद राय यांचा 'तनु वेड्स मनु' आणि 'रांझणा'मध्ये आपल्या भूमिकांनी बॉलिवूडमध्ये स्थायिक झालेल्या स्वरा भास्करचा 'मछली जल की रानी है' हा नवीन सिनेमा 13 जून रोजी रिलीज होणार आहे. या पॅरानॉर्मल-थ्रिलरनंतर कॉमेडी 'निल बटा सन्नाटा' हा सिनेमा येणार आहे. तिच्या करिअरमधील सर्वात मोठा सिनेमा म्हणजे सूरज बडजात्याचा 'प्रेम रतन धन पायो'. त्यामध्ये ती सलमान खानची धाकट्या बहीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सर्व गोष्टींवर स्वरासोबत काही बातचीत करण्यात आली. ही बातचीत सलोनी अरोराने केली असून वाचा स्वरा काय-काय म्हणाली...
तुझ्या मनात भय असताना तू हा सिनेमा का केलास?
मी खूप भित्रट आहे. सुरूवातीला मी नकार दिला मात्र दिग्दर्शक देबोलेय डेने मला समजावल. मी विचार केला, की स्टार आहे तर सर्व प्रकारच्या भूमिका साकारण्यास काय हरकत आहे.
इतर हॉरर सिनेमांपेक्षा 'मछली...' किती वेगळा आहे?
गंभीर आणि कथा स्वरुपाचा सिनेमा आहे. त्यामध्ये रोमान्स आणि अ‍ॅक्शन आहे. हा भूतांचा हॉरर नसून पॅरानॉर्मल थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमामध्ये रात्रीच्या अंधारात फक्त भिती दाखवली जाते. त्यातील भूतांच्या घटना दिवसा घडतात. याचे 60 टक्के शुटिंग दिवसा केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा स्वराने सिनेमाबद्दल आणखी काय सांगितले?