आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swetha Basu Prasad Gets Clean Chit From Hyderabad Sessions Court

सेक्स रॅकेट प्रकरणात अडकलेल्या श्वेताला कोर्टाची क्लीन चिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या श्वेताला वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाली अटक झाली होती....
'मकडी’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी श्वेता बासूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामुळे तिच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली होती. मात्र, तिला काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये वेश्या व्यवसायाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्वेताचे बॉलीवूड करिअर धोक्यात आल्याची इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती. या आरोपामुळे तिला मिळालेल्या काही चित्रपटांचे प्रस्तावदेखील रद्द करण्यात आले होते.

शनिवारी हैदराबादमधील सत्र न्यायालयाने या प्रकरणातातून श्वेताची निर्दोष मुक्तता केली. तिने न्यायालयाच्या या निकालावर आनंद व्यक्त करत म्हटले की, यामुळे माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद मला पुन्हा पाहता आला. आता श्वेता अनुराग कश्यपच्या फँटम फिल्म्स निर्मिती कंपनीमध्ये स्क्रिप्ट सल्लागाराचे काम करत आहे.