आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या सर्वात लाडक्या बहिणीचे झाले लग्न, पाहा अर्पिताचे Childhood Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्पिताची बालपणीची छायाचित्रे..)

बॉलिवूड स्टार सलमान खानने मोठ्या धुमधडाक्यात आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न लावून दिले. हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये लग्नाचा जल्लोष सुरु आहे. आज दुपारी अर्पिताची पाठवणी होणार आहे. बहिणीच्या लग्नाच्या तयारी सलमानसह अरबाज आणि सोहेल या भावंडांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.
अर्पिता बालपणापासूनच सलमानच्या खूप जवळ आहे. या दोन्ही बहीणभावाचे बाँडिंग खूप स्ट्राँग आहे. सलमानसोबतच्या स्टाँग बाँडिंगविषयी अर्पिताने सांगितले होते, "तसे पाहता सलमान भाई खूप बिझी असतो, मात्र माझ्यासाठी त्याच्याकडे नेहमी वेळ असतो. मला त्याच्याशी बोलण्यात कधीही अडचण येत नाही."
अर्पिता सलमानसोबतच आई सलमा खान आणि दुसरा भाऊ सोहेल खानच्याही खूप जवळ आहे. आपल्या आईविषयी अर्पिता म्हणते, "मी माझ्या आईसोबत छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असत. भाऊ सोहेल खान नेहमी माझी काळजी करत अशतो. जेव्हा मी कन्फ्युज्ड असते, तेव्हा वडील सलीम खान यांच्याकडून सल्ला घेते."
अर्पिता सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे. तिचे पालनपोषण मुंबईतच झाले. सलीम खान यांची ती सर्वात लहान मुलगी आहे. अर्पिताचा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार नाहीये. ती सध्या मुंबईतील एका इंटेरियर फर्मसोबत काम करत असून लवकरच तिला स्वतःचे फॅशन लेबल लाँच करायचे आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताची बालपणीची खास छायाचित्रे...