आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Talented Sound Designer Nimish Chheda Passes Away

'फँड्री'चा साऊंड डिझायनर निमिष छेडाचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध तरुण साऊंड डिझायनर आणि एडिटर निमिष छेडा याचे आज (1 मार्च) निधन झाले. गेल्या आठवड्यात निमिषला अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
सुजय डहाकेच्या 'शाळा' आणि 'आजोबा', नागराज मंजुळेंच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'फँड्री' या सिनेमासाठी निमिषने साऊंड डिझायनर म्हणून काम केले होते. आगामी 'चौर्य' या मराठी सिनेमासाठीही त्याने साऊंड डिझायनिंग केले होते.
मराठीतच नव्हे तर हिंदीतही निमिष कार्यरत होता. सावरिया, कमीने, जॉनी गद्दार, गो गोवा गॉन, नमस्ते लंडन या सिनेमासाठी त्याने साऊंड डिझायनर म्हणून काम केले होते. याशिवाय अनिल कपूरच्या '24' या मालिकेसाठीही त्याने साऊंड डिझायनिंगचे काम केले होते. निमिषच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.