आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tall Actresses Of Bollywood Who Fail To Make Successful Career

जास्त उंची ठरली या अॅक्ट्रेसच्या करिअरमधील अडथळा, या 6 जणीदेखील उंचीमुळे झाल्या हैराण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सोनाली बेंद्रे)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आज आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. सोनालीने मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. स्टारडस्ट टॅलेंट सर्च मधून तिची निवड झाली होता. तिने अनेक आघाडीच्या कलाकारांकडून अभिनयाचे धडे गिरवले. 1994मध्ये 'आग' या सिनेमाद्वारे गोविंदासोबत तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
फार यशस्वी ठरले नाही फिल्मी करिअरः
सोनालीची गणना इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये होत होती. मात्र आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ती कधी सामील होऊ शकली नाही. अनेक हिट सिनेमांमध्ये ती झळकली, मात्र सिनेमाला मिळालेल्या यशाचे क्रेडिट तिला कधी मिळाले नाही. दिलजले (1996), भाई (1997), डुप्लीकेट, मेजरसाब (1998), सरफरोश, हम साथ साथ हैं (1999) या हिट सिनेमांमध्ये सोनालीने काम केले आहे. हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगूमध्येही सोनाली झळकली आहे.
अधिक उंची आणि सडपातळ कंबरेमुळे राहिली हैराणः
सोनाली बेंद्रेची उंची 5.8 फूट इतकी आहे. लग्नानंतर अभिनयापासून दूर गेलेल्या सोनालीने हे मान्य केले होते, की अधिक उंची आणि सडपातळ कंबरेमुळे तिला अधिक सिनेमे मिळाले नाहीत. सोनालीने अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केले. मात्र कधीही तिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये झाली नाही.
सोनाली आता सिनेमांपासून दूर असून टीव्ही मालिकेत अभिनय करत आहे. सोनालीची 'अजीब दास्तां है' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर सुरु आहे.
आज मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी लूक्ससोबतच चांगली हाइट आणि पर्सनॅलिटीसुद्धा महत्त्वाची असते. सध्याच्या काळातील बी टाऊनमधील जास्तीत जास्त अभिनेत्री या ब-याच उंच आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण, सोनम कपूर, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा उंचीच काही अभिनेत्रींच्या करिअरसाठी अडथळा ठरली होती. जास्त उंचीमुळे या अभिनेत्रींचे करिअर फ्लॉप ठरले. युक्ता मुखीपासून ते पूजा बत्रा आणि सुश्मिता सेनपर्यंत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना हाइटमुळे अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला. पूजा बत्राने एका मुलाखतीत सांगितले होते, की जास्त हाइट असल्यामुळे हीरो तिच्यासोबत काम करण्यास नकार देत होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी कोणत्या अभिनेत्रींच्या करिअरमध्ये अधिक उंची ठरली अडथळा...