आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या उंच अभिनेत्री ठरल्या बी टाऊनमध्ये फ्लॉप, जास्त उंची ठरली करिअरमधील अडथळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पूजा बत्रा)
आज मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी लूक्ससोबतच चांगली हाइट आणि पर्सनॅलिटीसुद्धा महत्त्वाची असते. सध्याच्या काळातील बी टाऊनमधील जास्तीत जास्त अभिनेत्री या ब-याच उंच आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण, सोनम कपूर, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा उंचीच काही अभिनेत्रींच्या करिअरसाठी अडथळा ठरली होती. जास्त उंचीमुळे या अभिनेत्रींचे करिअर फ्लॉप ठरले.
युक्ता मुखीपासून ते पूजा बत्रा आणि सुश्मिता सेनपर्यंत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना हाइटमुळे अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला. पूजा बत्राने एका मुलाखतीत सांगितले होते, की जास्त हाइट असल्यामुळे हीरो तिच्यासोबत काम करण्यास नकार देत होते.
1990-2000 या काळात इंडस्ट्रीत आलेल्या उंच अभिनेत्रींना भरपूर काम मिळाले नाही. कारण त्यांचे को-स्टार्स (हीरो) त्यांच्यापेक्षा ठेंगणे होते. त्यामुळे उंच अभिनेत्री आणि ठेंगणा हीरो असलेल्या जोडीला निर्माते-दिग्दर्शक आपल्या सिनेमात घेत नव्हते.
पूजा बत्रा
उंचीः 5 फूट 10 इंच

पूजा बत्राची उंची 5 फूट 10 इंच आहे. तिने हिंदीसह तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये जवळजवळ 20 सिनेमांमध्ये झळकलेल्या पूजाला येथे हवे तसे यश मिळाले नाही.
'हसीना मान जाएगी', 'कही प्यार ना हो जाए' हे तिचे यशस्वी सिनेमे आहेत. यामध्ये संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे तिचे हीरो होते. मल्टीस्टारर सिनेमांमध्ये झळकलेली पूजा आता फिल्मी दुनियेतून जणू गायबच झाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी काही अभिनेत्रींविषयी..