आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एन्टरटेन्मेंट' ठरवणार तमन्नाचे बॉलिवूडमधील भविष्य, बघा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'एन्टरटेन्मेंट' हा सिनेमा आज सिल्व्हर स्क्रिनवर दाखल झाला आहे. या सिनेमात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसह स्क्रिन स्पेस शेअर करण्याची संधी तिला मिळाली आहे. यापूर्वी तमन्ना साजिद खान दिग्दर्शित 'हमशकल्स' या सिनेमात झळकली होती. तमन्ना बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे.
मुंबईत जन्मलेल्या आणि लहानाची मोठी झालेल्या तमन्नाने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'चांद सा रोशन चेहरा' या सिनेमात ती आफताब शिवदासानीसह झळकली होती. मात्र हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला, हे कुणालाच कळले नाही. हा एक सुपरफ्लॉप सिनेमा ठरला. सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'श्री' या तेलगू सिनेमात काम करण्याची तिला संधी मिळाली. तिच्या अपोझिट सिनेमात अभिनेता मनोज मंजू होते.
2006मध्ये तमन्ना पुन्हा एकदा तेलगू सिनेमात झळकली. 'केडी' हे तिच्या दुस-या सिनेमाचे नाव होते. या सिनेमाद्वारे इलियाना डिक्रूजने डेब्यू केले होते. मात्र या सिनेमाद्वारे तमन्नाला ओळख प्राप्त होऊ शकली नाही. त्यानंतर आलेल्या 'हॅप्पी डेज' या सिनेमाद्वारे तिला यशाची चव चाखायला मिळाली. शेखर कमूला यांनी हा तेलगू सिनेमा दिग्दर्शित केला होता.
मोजक्या तेलगू सिनेमांमध्ये झळकल्यानंतर तमन्ना तामिळ सिनेमांकडे वळली. 'कल्लूर' या तामिळ सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. 2009 मध्ये साउथचा सुपरस्टार धनुषसह काम करण्याची संधी तिला मिळाली. धनुष आणि तमन्ना स्टारर 'पडीकथावन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमामुळे तमन्नाचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.
2013 मध्ये साजिद खानच्या 'हिम्मतवाला' सिनेमाद्वारे तमन्ना पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळली. हा सिनेमा फारसा गाजला नाही. त्यानंतर साजिद खानच्याच 'हमशकल्स' या सिनेमात ती झळकली. या सिनेमालासुद्धा प्रेक्षकांनी नाकारले. आता 'एन्टरटेन्मेंट' या सिनेमात तमन्ना अक्षय कुमारसह झळकणार आहे. आता तमन्नाचा 'एन्टरटेन्मेंट' हा सिनेमा प्रेक्षकांना एन्टरटेन करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण या सिनेमावर तमन्नाचे बॉलिवूडमधील पुढील करिअर अवलंबून असणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा तमन्ना भाटियाची इंस्टाग्राम आणि ट्विटरवरुन घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...