आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tattoo crazy: पाहा बॉलिवूड सेलेब्सने शरीराच्या कोण-कोणत्या अवयवांवर गोंदवले आहेत टॅटू?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणविषयी दोन आश्चर्यचकित करणा-या गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे, सुपरस्टार सलमान खानचा 'किक'मध्ये आयटम नंबर करण्यास तिने नकार दिला आहे, तसेच दुसरी गोष्ट म्हणजे, तिच्या मानेवरील आर.के नावाचा टॅटू गायब झाला आहे.
पहिल्या बातमीविषयी सांगायचे झाले तर, शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू इअर'मध्ये 'बेबी डॉल' आयटम साँग केल्यानंतर तिने निर्णय घेतला आहे, की आता दुसरे आयटम साँग करायचे नाही. कदाचित या कारणानेच सलमानला तिच्चाकडून नकार मिळाला असावा.
दुस-या बातमीविषयी सांगायाचे झाले तर, दीपिका स्वत: एका जाहिरातीत विचारते, की लोक तिच्या मानेकडे का बघतात? जर बारकाईने बघितले तर तिच्या मानेवरील टॅटू गायब झालेला आहे.
अधिक मेकअप केल्याचे कारणसुध्दा त्यामागे असू शकते. परंतु या जाहिरातीला बनवणारे अनुराग कश्यप यांच्या सांगण्यानुसार, शुटिंगवेळी दीपिकाच्या मानेवर टॅटू दिसलाच नाही.
दीपिका जेव्हा रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती तेव्हा तिचा हा टॅटू सर्वाधिक चर्चेत आला होता. आरके नावाच्या या टॅटूला रणबीरच्या नावाशी जोडले जाते. सध्या रणवीर सिंहसह अफेअरच्या बातम्यांनी ती चर्चेत आहे.
तसे पाहता, बॉलिवूडमध्ये टॅटूचा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे. दीपिकाव्यतिरिक्त अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी विविध अवयवांवर टॅटू गोंदून घेतलेले आहेत. चला एक नजर टाकूया या सेलेब्सच्या टॅटूंवर...