आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bollywood Teachers: कुणी प्रेमाचे तर कुणी जीवन जगण्याचे दिले धडे, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुश्मिता सेन, शाहरुख खान आणि आमिर खान)
बॉलिवूडमध्ये अनेक विषयांवर सिनेमे बनले आहेत. लव्ह, ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन यांसारख्या विषयांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण. बॉलिवूड सिनेमे प्रेमासह आयुष्य जगण्याची पद्धतसुद्धा शिकवतात. या इंडस्ट्रीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर अनेक सिनेमे तयार झाले आहेत.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन यांनी सिनेमांमध्ये शिक्षकाची भूमिका वठवून विद्यार्थ्यांना पाठ शिकवले. शाहरुखने 'मोहब्बतें' या सिनेमात आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाचा धडा शिकवला, तर आमिरने 'तारें जमीं पर' या सिनेमात शिक्षणाच्या माध्यमातून एका लहान मुलाचा डिस्लेक्सियासारखा आजार दूर करण्यास मदत केली. अमिताभ यांनी 'ब्लॅक' या सिनेमात एका आंधळ्या मुलीला आयुष्य जगण्याचे धडे दिले. एकंदरीतच बॉलिवूडच्या या शिक्षकांनी आपापले विषय उत्कृष्टरित्या हाताळले.
एकीकडे हीरो शिक्षण बनले, तर दुसरीकडे अभिनेत्रींसुद्धा यात मागे नाहीत. 'मैं हू ना' या सिनेमात सुश्मिता सेन, 'स्वदेश'मध्ये गायत्री जोशी या अभिनेत्री शिक्षिकेच्या भूमिकेत झळकल्या. शिक्षक दिनाच्या निमित्तानेआम्ही तुम्हाला बी टाऊनमधील अशाच 12 शिक्षकांची ओळख करुन देत आहोत.
शिक्षकाच्या भूमिकेतः शाहरुख खान (राज आर्यन मल्होत्रा)
सिनेमाः मोहब्बतें
दिग्दर्शकः आदित्य चोपड़ा
रिलीजः 27 ऑक्टोबर 2000
राज आर्यन मल्होत्रा (शाहरुख खान) गुरुकुलमध्ये संगीत शिक्षक असतो. तो आपल्या विद्यार्थ्यांना संगीतासोबतच प्रेमाचे धडे देतो.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा बी टाऊनच्या आणखी काही शिक्षकांना...