'होणार सून मी ह्या घऱची' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेले श्री आणि जान्हवी अर्थातच तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर आज ख-या आयुष्यात लग्नगाठीत अडकले. सेलिब्रेटींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत तेजश्री केतकरांच्या घरची खरीखुरी सून झालीय. पुण्यात त्यांचा लग्नसोहळा संपन्न होतोय.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत होती. अखेर आज हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.
लग्नसोहळ्यात आगंतुक पाहुण्यांची गर्दी वाढायला नको, म्हणून लग्नासाठी आमंत्रण दिलेल्यांना एक पत्रिका आणि त्यांच्या घरातून येणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रवेशिका देण्यात आली आहे. तसंच रिसेप्शनच्याही प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. लग्नसोहळ्यात कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये केवळ यासाठी त्यांनी ही प्रवेशिकेची अट घातली होती.
मराठमोळ्या वरवधूच्या रुपात तेजश्री आणि शशांक खूप सुंदर दिसत आहेत. या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेतील त्यांचे सहकलाकार म्हणजे श्रीच्या सहाही आया लग्नात सहभागी झाल्या होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा तेजश्री आणि शशांकच्या लग्नाची काही खास निवडक छायाचित्रे..