आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejashree Pradhan And Shashank Ketkar Tie The Knot On 8th Feb

जान्हवी-श्री ख-या आयुष्यात होणार सौ आणि श्री, 8 फेब्रुवारीला अडकणार लग्नगाठीत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील लोकप्रिय जोडी श्री आणि जान्हवी म्हणजे अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे शशांकने divyamarathi.comला फोनवरुन बोलताना सांगितले. पुण्यात अगदी जवळचे नातलग आणि खास मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
शशांक आणि तेजश्रीच्या लग्नसोहळ्याविषयीची एक खास गोष्ट म्हणजे पाहुण्यांना निमंत्रण पत्रिकेसह माणशी एक प्रवेशिका देण्यात येणार आहे. याविषयी शशांक म्हणाला की, ''लग्नसोहळ्यात आगंतुक पाहुण्यांची गर्दी वाढायला नको, म्हणून लग्नासाठी आमंत्रण दिलेल्यांना एक पत्रिका आणि त्यांच्या घरातून येणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रवेशिका देण्यात आली आहे. तसंच रिसेप्शनच्याही प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. लग्नसोहळ्यात कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये केवळ यासाठी ही प्रवेशिकेची अट घालण्यात आली आहे.''
सध्या शुटिंग सांभाळत लग्नाची तयारी सुरु आहे आणि लग्नासाठी मोठी सुट्टी घेतली नसल्याचेही शशांकने सांगितले. हनीमुनचे काय प्लानिंग आहे, या प्रश्नावर शशांकने अद्याप काहीही ठरले नसल्याचे सांगितले.
तसं पाहता काही दिवसांपूर्वीच 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेत श्री आणि जान्हवीचे लग्न झाले होते. त्यांचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला होता. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या लग्नाला तेजश्री आणि शशांकच्या कुटुंबीयांनीही हजेरी लावली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये सुत जुळल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती. आता रिल लाईफमध्ये नव्हे तर ख-याखु-या आयुष्यात या दोघांना पुन्हा तोच सोहळा अनुभवता येणार आहे. पुढील स्लाईड्मध्ये आम्ही तुम्हाला मालिकेत लग्नगाठीत अडकल्यानंतरची श्री-जान्हवी म्हणजेच तेजश्री-शशांकची छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ही खास छायाचित्रे...