आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजश्री प्रधान झाली सून ‘त्याच’ घरची,मालिकेतील श्री आणि जान्हवी खर्‍याखुर्‍या विवाहबंधनात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तमाम महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबातील महिलांच्या गळ्यातील ताईत बनलेली श्री (शशांक केतकर) व जान्हवी (तेजश्री प्रधान) ही जोडी शनिवारी खर्‍या आयुष्यात कायमस्वरूपी विवाहबंधनात बांधली गेली. ‘होणार मी सून ह्या घरची’ या मालिकेत काम करताना दोघांचेही प्रेम जमले आणि त्यास शनिवारी सातजन्माच्या सोबतीचे सोनेरी कोंदण लाभले. पुण्यात मोजक्याच आप्तेष्ट, सहकलाकारांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न करून श्री आणि जान्हवी विवाहबंधनात अडकले. प्रधानांची तेर्जशी केतकरांच्या घरची सून झाली आणि आवडता लक्ष्मीनारायणाचा जोडा लग्नबंधनात अडकल्याने प्रेक्षकही सुखावले आहेत.
तेजश्री ही मुंबईतील डोंबिवलीची तर श्री पुण्यातला. दोघांचीही पहिली भेट ‘होणार सून’ मालिकेच्या सेटवर झाली. मालिकेत प्रियकर व प्रेयसी आणि नंतर पती-पत्नीची भूमिका साकारत असताना दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले व त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला. श्री व जान्हवी यांच्यात चांगल्या प्रकारचा समन्वय साधला गेल्याने तसेच मालिकेतील इतर टीमचीही त्यास योग्य साथ मिळाल्याने अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मालिकेतील या जोडप्याने खर्‍याखुर्‍या आयुष्यातही लग्न करावे अशीच रसिक प्रेक्षकांची अपेक्षा होती. दोघांची जोडी हिट ठरल्याने त्यांना भेटण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले. शनिवारी दोघे लग्नाचे रेशीमगाठीत बांधले जात असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मालिकेची सर्व टीम उपस्थित होती. शनिवारी संध्याकाळीच दोघांच्या लग्नाचा स्वागत समारंभ मोठय़ा थाटामाटात पार पडला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित होते.