आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejshree Pradhan News In Marathi, Marathi Film Industry, Shshank Ketkar, Divya Marathi

तेजश्री म्हणते, \'खर्‍या आयुष्यातही ‘श्री’ घेत आहे उत्तम काळजी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत श्री जसा माझी काळजी घेतो. तसाच तो आता वैवाहिक जीवनातही घेत आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने मला आयुष्यातही तसाच श्री मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया या मालिकेतील अभिनेत्री तेर्जशी प्रधानने व्यक्त केली. यवतमाळ येथे जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान तेजश्री पत्रकारांशी बोलत होती. या वेळी तिच्यासोबत तिचे पती शशांक केतकर आणि महाविद्यालयाचे सचिव शीतल वातीले उपस्थित होते.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे सामाजिक प्रबोधन होत आहे. प्रेक्षकांचे जसे प्रबोधन होते तसेच आमच्यासारख्या कलाकारांचेही होत असते. मराठीमध्ये अशा प्रबोधन करणार्‍या मालिका बनणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. ‘द रिअल हीरो - प्रकाश आमटे’ या मराठी चित्रपटात केलेली माई आमटे यांची भूमिका आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहील. जिवंत असलेल्या व्यक्तीला अभिनयाद्वारे सादर करणे हे जग सोडून गेलेल्या व्यक्तीपेक्षा कठीण असल्याचेही तेर्जशी म्हणाली. या चित्रपटाचा सिंगापूर येथे प्रीमिअर असून, त्यासाठी आपण जाणार आहे. मे महिन्यात हा चित्रपट भारतात प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले. शशांक केतकर यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून आपले करिअर घडवण्याचा सल्ला दिला. अभ्यास करा, सोबतच आपले छंद जोपासा. आता वर्ल्ड कप येणार असल्याने अभ्यासासोबतच या खेळाचा आनंद घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. मालिका किंवा चित्रपटात निगेटिव्ह का असेना रोल स्वीकारण्यास तयार आहे.