आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोफेसर ते 'कॉमेडी किंग'पर्यंतचा प्रवास, 1000 सिनेमांमध्ये काम करुन बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॉमेडियन ब्रह्मानंदम)
मुंबईः फिल्मी दुनियेत अनेक कलावंत असे आहेत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात छोटी भूमिका साकरुन केली. मात्र आज ते या इंडस्ट्रीत यशोशिखरावर पोहोचले आहेत. असेच एक कलावंत म्हणजे प्रसिद्ध विनोदवीर ब्रह्मानंदम. तेलगू सिनेसृष्टीतील स्टार ब्रह्मानंदम यांना अलीकडेच साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड्स (SIIMA) सोहळ्यात सर्वोत्कृष्ट कॉमेडियनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंध्र प्रदेशातील साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात 1 फेब्रुवारी 1956 रोजी ब्रह्मानंदम यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात ब्रह्मानंदमच एकमेव एमए पर्यंत शिकलेले सदस्य होते. त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर अत्तिल्ली कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कॉलेजमध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना मिमिक्री करुन हसवायचे.
एकेदिवशी इंटर कॉलेज ड्राम कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर नाटकात त्यांची रुची वाढत गेली. याचदरम्यान तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक जन्धयाला यांनी ब्रह्मानंदम यांना 'मोद्दबाई' नावाच्या नाटकात अभिनय करताना पाहिले. नाटकातील त्यांच्या अभिनयाने इम्प्रेस होऊन दिग्दर्शक जन्धयाला यांनी त्यांना आपल्या 'चन्ताबाबाई' या सिनेमात ब्रह्मानंदम यांना एक छोटी भूमिका ऑफर केली. अशाप्रकारे ब्रह्मानंदम यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.
यानंतर जन्धयाला यांच्या 'आहा न पेल्लानता' या दुस-या सिनेमात ब्रह्मानंदम यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या सिनेमानंतर ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रसिद्ध झाले. आत्तापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद...
ब्रह्मानंदम यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. एकाच भाषेत सातशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केल्याचा रेकॉर्ड 2007 मध्ये त्यांच्या नावी नोंदवला गेला. इतकेच नाही तर सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी त्यांना 2009 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. 58 वर्षीय या अभिनेत्याने आपल्या दोन दशकांच्या करिअरमध्ये एक हजारांहून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘अहा ना पेल्लंता’, ‘अप्पुला अप्पा राव’, ‘किंग’, ‘रेड्डी’, 'रच्चा' 'आर्या 2' आणि ‘बपालू’ हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ब्रह्मानंदम यांची सिनेमातून घेण्यात आलेली निवडक कॉमिक छायाचित्रे...