आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज झाला अर्जुन-सोनाक्षीच्या \'तेवर\'चा ट्रेलर, छायाचित्रांतून पाहा झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तेवर'चा ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा)
मुंबई- आगामी सिनेमा 'तेवर'चा ट्रेलर सोमवारी (12 नोव्हेंबर) रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी, अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे सिनेमात कोणते पात्र आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. मनोज वाजपेयी मथुरेचा गुंडा गजेंद्र सिंहच्या पात्रात दिसत आहे. त्याला सोनाक्षी सिन्हाशी लग्न करायचे असते. सोनाक्षी राधिका नावाच्या भूमिकेत दिसत आहे. राधिकाला गजेंद्र आवडत नाही.
अर्जुन कपूरने आग्र्याच्या एका महाविद्यालयीन मुलगा पिंटूची भूमिका वठवली आहे. तो कबड्डी चॅम्पियन असून गजेंद्र सिंहपासून राधिकाला वाचवतो. अर्जुन कपूरची दमदार अॅक्शन सिनेमात पाहायला मिळणार आहे.
ट्रेलर पाहिल्यावर दिसते, की सिनेमाची कथा राधिकामुळे गजेंद्र आणि पिंटू यांच्यात वाढलेल्या शत्रुत्वावर आधारित आहे. सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल सिनेमा नेमकी कहानी काय आहे ते. आमित शर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आणि बोनी-संयय कपूर प्रॉडक्शनमध्ये निर्मिती हा सिनेमा 9 जानेवारी रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या ट्रेलरची छायाचित्रांच्या माध्यमातून झलक...