आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘द अ‍ॅव्हेंजर्स’ जगातील तिसरा ऑलटाइम महाचित्रपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - ‘द अ‍ॅव्हेंजर्स’ ऑलटाइम चित्रपटांच्या स्पर्धेत हॅरी पॉटर, डेथली हॉलोज - पार्ट 2 या चित्रपटांना पिछाडीवर टाकून जगभरातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
बॉक्स ऑफिसवर या सुपरहीरो चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. ‘द अ‍ॅव्हेंजर्स’ने 133 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. याअगोदर कमाईचा विक्रम हॅरी पॉटरच्या नावावर होता. हॅरी पॉटरने 132 कोटी डॉलर्सचा गल्ला गोळा केला होता. या कमाईमुळे द अ‍ॅव्हेंजर्स सहजपणे अव्वलस्थानी बसला आहे. ‘अवतार’ चित्रपटाने 288 कोटी डॉलर्स तर ‘टायटॅनिक’ने 211 कोटी डॉलर्सचे उत्पन्न मिळवले होते. डेथली हॉलोजने वेगाने विक्रम केला होता. त्या विक्रमाचीही ‘द अ‍ॅव्हेंजर्स’ने बरोबरी केली आहे. एकोणीस दिवसांत कमाई करण्याचा विक्रम होता. ‘द अ‍ॅव्हेंजर्र्स’ने ‘द हंगर गेम्स’ला सहजपणे मात दिली.
अमेरिकेच्या अंतर्गत विचार केल्यास अ‍ॅव्हेंजर्सने शुक्रवारीच हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. अर्थात 1 जून रोजी त्याने द डार्क नाइटला पछाडले. दुसरीकडे पहिल्याच आठवड्यात 5 कोटी 6 लाखांचे उत्पन्न क्रिस्टन स्टीवर्ट अभिनीत ‘स्नो व्हाइट अँड द हंट्समन ’ने केल्याचा दावा ‘हॉलीवूड रिपोर्टर’ने केला आहे. मागील आठवड्यात मेन इन ब्लॅक-3 हा चित्रपट अव्वलस्थानी होता. त्यात चार्लिझ थेरॉन, ख्रिस हेम्सवर्थ यांच्या भूमिका आहेत. हॉलीवूडमध्ये विक्रम केवळ नवीन चित्रपटच करतात असे नाही. कारण मेन इन ब्लॅकने 2 कोटी 90 लाखांचे उत्पन्न मिळवले.

ऑस्ट्रेलियात बॉलीवूड स्टार
मेलबर्न । ऑस्‍ट्रेलियातील एका रिअ‍ॅलिटी शोमधून बॉलीवूडचा भावी स्टार निवडला जाणार आहे. भारतीय सिनेमावरील प्रभाव व प्रसिद्धीचा उपयोग करून घेण्यासाठी अशा प्रकारचा शो सुरू झाला आहे. या कार्यक्रमात निवड झालेल्या कलाकाराला दिग्दर्शक महेश भट यांच्या चित्रपटात संधी दिली जाणार आहे.
हा शो चार भागांत दाखवला जाणार असून मागील 28 मे रोजी हा शो सुरू झाला आहे. या शोच्या परीक्षकांमध्ये बॉलीवूड निर्माते अनुपम शर्मा, फोटोग्राफर राज सुरी व कोरिओग्राफर दीप्ती पाटील यांचा समावेश आहे. बॉलीवूडच्या शेकडो चाहत्यांनी स्टार होण्याचे स्वप्न बाळगून रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनला हजेरी लावली होती. यातून सहा जणांची निवड केली जाणार असून त्यानंतर त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. बॉलीवूड स्टार हा शो ब्रिटिश व्हर्जन असल्याचे सांगितले जाते.
हॉलीवूड अभिनेता जॉनी डेपला भारताचे आकर्षण
हॉलीवूड स्टार कॅली ब्रुकला एका रात्रीसाठी सात कोटींची ऑफर