आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Dirty Picture To Telecast On Small Scree On Prime Time

आता प्राईम टाईममध्ये दिसणार विद्याचा 'डर्टी पिक्चर'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्या बालनच्या ' डर्टी पिक्चर 'ला अखेर टीव्हीवर प्राइम टाइममध्ये दाखवण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यासाठी निर्माती एकता कपूरला चित्रपटातले अनेक संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवावी लागली आहे. कारण तशी सूचना सेन्सॉर बोर्डने केली आहे .
'सोनी वाहिनी' वर यावर्षी एप्रिल महिन्यात हा चित्रपट दाखवण्यात येणार होता. मात्र 'फक्त प्रौढांसाठी' (ए सर्टिफिकेट) असे प्रमाणपत्र दिले असल्याने हा चित्रपट प्राइम टाइममध्ये म्हणजे रात्री अकरा वाजण्यापूर्वी टीव्हीवर प्रसारीत करू नये, असा निर्णय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. या निर्णयामुळे सोनी वाहिनीने या चित्रपटाचे प्रसारणच रद्द केले होते.
सेंसॉर बोर्डाची सीईओ पंकजा ठाकूर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'डर्टी पिक्चर'ला प्राइम टाईममध्ये दाखवण्याची परवानगी मिळाली आहे. म्हणजेच आता रात्री ९ ते ११ दरम्यान हा चित्रपट छोट्या पडद्यावर प्रसारित होऊ शकतो. मात्र त्यासाठी चित्रपटातील वादग्रस्त असलेली तीन मिनिटे आणि १० सेकंदाची दृश्ये वगळण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे याआधीच सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देताना सुचवलेल्या ५९ कट्ससह आणखी काही दृश्ये कापून हा सिनेमा रात्री ११ नंतर प्रसारीत करण्याची परवानगी दिली होती.
सेंसॉर बोर्डाने सांगितलेली दुरुस्ती केल्यानंतर आता या चित्रपटाला प्राइम टाईममध्ये दाखवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

'एकता कपूरला 'डर्टी लेडी'चा किताब द्या !'
प्रसारण मंत्रालयाने सोनी वाहिनीवरील 'द डर्टी पिक्‍चर'चे प्रसारण रोखले
'डर्टी' विद्याने इंडियन, वेस्टर्न लुकसह ६० वेळा दिली होती स्क्रीन टेस्ट