आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Expose 2 Will Be Inspired From Rajesh Khanna\'s Life

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर आधारित असेल \'द एक्स्पोज 2\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमेश रेशमियाचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘द एक्सपोज’च्या यशानंतर सिनेमाचा सिक्वेल बनवला जाणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि हिमेश यांच्यात उपजलेल्या वादानंतर सिक्वेल येणार नाही असे वाटत होते, परंतू आता सिनेमाच्या कथेवर जोमाने काम चालू झाले आहे. त्यावर रिसर्चदेखील केला जात आहे.
‘द एक्सपोज’ची कथा 60च्या दशकातील पोलिस अधिकार्‍याची होती, जो नोकरी सोडून सिनेमात काम करण्यासाठी येतो आणि एक खरीखुरी केस सोडवतो. हिमेशनं साकारलेलं रवि कुमार हे पात्र प्रत्यक्षात हिंदी सिनेमातले नावाजलेले कलाकार राज कुमार (मदर इंडिया, वक्त, नील कमल, तिरंगा) यांच्यापासून प्रेरित होतं.

राज कुमार यांच्याही आयुष्याचा प्रवास असाच होता. सिनेमाचे संवाददेखील त्यांच्याच शैलीतले होते. आता ‘द एक्सपोज-2’ 70च्या दशकातले रोमँटिक नायक राजेश खन्ना यांचं आयुष्य चित्रित करेल.
विश्वसनीय सूत्रांच्या मते, सिनेमाची गोष्ट अशाप्रकारे प्लान केली जात आहे की, एक रोमँटिक नायक असतो ज्याचे सिनेमे सुपर-डूपर हिट होतात आणि एक दिवस तो कोणत्याही घोषणेशिवाय अचानक लग्न करतो. यानंतर देशभरातल्या अनेक तरुणी आत्महत्या करतात. सिनेमाचा नायक एका जवळच्या मुलीच्या मृत्यूनंतर म्हणतो की ही आत्महत्या नसुन खून आहे. तो हे गुढ सोडवतो.
राजेश खन्नांच्या 70 च्या दशकात अशाच अनेक चाहत्या होत्या आणि एक दिवस अचानक त्यांनी जेव्हा डिंपल कपाडियाशी लग्न केलं, तेव्हा या तरुणींचं मन मोडलं होतं. या गोष्टीसोबत मृत्यूचं रहस्य जोडून ‘द एक्सपोज-2’ बनवला जाणार आहे. सिनेमात हिमेश रोमँटिक गाणी म्हणणार आहे ज्यात त्याची शैली राजेश खन्ना यांच्यासारखीच असेल. तो त्यांचे सिनेमे, त्यांची सिनेसृष्टीतली कारकीर्द, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, राहणीमान मित्र-परिवाराबद्दल माहिती करून घेत आहे.

त्याची टीम हा शोध संपल्यावर एक रिपोर्ट बनवणार आहे. फिल्मसाठी तो आपला वेगळा लूकदेखील डिझाइन करून घेत आहे. सूत्रांच्या मते या लूक्सची ट्रायलदेखील चालू झाली आहे.