आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीत 'द फोकारा' नावाने साजरी केली जाते होळी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण-पूर्व इटलीच्या नोवोली शहरात दरवर्षी होळीसारखा ‘द फोकारा’ नावाचा महोत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षी 7 ते 18 जानेवारीपर्यंत हा सण साजरा केला जातो. यात 20 मीटर उंच भुशाच्या ढिगात फटाके लावून त्याला पेटवण्यात येते. या आगीला पाहण्यासाठी 60 हजारांपेक्षा जास्त लोक येतात. 16 जानेवारीला मुख्य सण साजरा करण्यात येतो. आपला गहू कापल्यानंतर शेतकरी त्याचा भुसा जमा करतात. 16 तारखेला सेंट अँथनीचे चित्र चर्चमधून काढण्यात येते. चित्राला पूर्ण शहरात फिरवले जाते. त्यानंतर रात्री 8 वाजता फोकारामध्ये आग लावण्यात येते. ही होळी रात्रभर जळते. येथे हजारो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. या सणापासून हिवाळा संपून वसंत ऋतूची सुरुवात होते. खरं तर या सणाला सेंट अँथनीला सर्मपित केले जाते, कारण त्यांनी नोवालीची सुरक्षा केली होती. या सणाची तयारी डिसेंबरपासूनच सुरू होते.