आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The HERO And His Heroine: Sooraj And Athiya Shoot In Manali

First Look:सूरज पांचोलीसोबत बी-टाऊनमध्ये एंट्री घेतेय सुनील शेट्टीची मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरज पांचोली सध्या आपल्या पहिल्या 'हीरो' या बॉलिवूड सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाची शुटिंग मनालीमध्ये चालू आहे. या सिनेमामध्ये त्याची को-स्टार अथिया शेट्टी असून ती सुनील शेट्टीची मुलगी आहे. तसेच सूरज बॉलिवूड स्टार अदित्य पांचोलीचा मुलगा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूनंतर सूरजचे नाव चर्चेत आले होते. कारण तो जियाचा बॉयफ्रेंड होता. 2 जून 2013ला जेव्हा जियाचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला तेव्हा सूरजला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. जियाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्याचा आरोप लावून तक्रार दाखल करून सूरजला ताब्यात घेण्यात आले होते. परंतु काही दिवसांनंतर त्याला जामीनाच्या आधारे तुरूंगातून सुटका मिळाली. सूरजने तुरूंगाच्या बाहेर येताच आपल्या बॉलिवूड पदार्पणाच्या सिनेमावर काम करण्यास सुरूवात केली.
'हीरो' सिनेमात सलमान खानच्या प्रॉडक्शनखाली बनवला जात असून मनालीमध्ये चालू असलेल्या शुटिंगदरम्यान अथिया आणि सूरजचे एक छायाचित्रे कॅमे-यात कैद करण्यात आले. या छायाचित्रात सूरजच्या चेह-यावर रक्ताचे डाग असून अथिया मस्तीभ-या अंदाजात दिसत आहे. या सिनेमातून सूरज आणि अथिया आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणार आहेत.
सिनेमाचा दिग्दर्शक निखिल अडवाणीने या छायाचित्रावर टि्वट केले, "Mere do anmol ratan. Don't think this is what Anaita Adajania had in mind when she started styling." मनालीमध्ये सध्या 'हीरो'टी टीम पहिल्या वेळापत्रकाची शुटिंग करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिनेमाच्या शुटिंगची काही छायाचित्रे...