हैदराबाद: हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट प्रकरणात रंगेहात पकडल्या गेलेली अभिनेत्री श्वेता प्रसाद बसूच्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, पोलिसांनी सापळा रचून श्वेताला रंगेहात अटक केल्याचा उल्लेख बंजारा हिल्स पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. श्वेताला ज्या हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले होते, ते संतोषन अवॉर्ड्सच्या आयोजकांनी बुक केले होते.
याप्रकरणी हैदराबाद पोलिस आयुक्तांच्या टास्क फोर्सचे म्हणणे आहे, की त्यांनी ग्राहक बनून दलाल बाबूच्या माध्यमातून श्वेतासोबत संपर्क साधला होता. बालूशी डिल झाल्यानंतर पोलिसांची टीम ग्राहकाच्या रुपात खोलीत शिरली होती. पोलिस अधिकारी एन कोटी रेड्डी यांनी सांगितले, की जोपर्यंत पोलिसांनी खरी ओळख दिली नाही, तोपर्यंत अभिनेत्री तिच्या कामासाठी तयार झाली होती. दलालाने अभिनेत्रीच्या म्हणण्यावरुन आमच्याकडून पैसे घेतले आणि त्यातून स्वत:चे कमिशन काढून घेतले.
तर याप्रकरणी श्वेताचे म्हणणे आहे, की पोलिस तिला अडकवत आहेत. संतोषन अवॉर्ड्सच्या आयोजकांच्या निमंत्रणावरुन ती तेथे गेली होती. कोर्टात कॅमे-यासमोर श्वेताची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी मात्र श्वेता खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की हे वेश्यावृत्तीचे प्रकरण आहे. बालू या व्यवसायाला चालवत होता. स्थानिक कोर्टाने मंगळवारी (30 सप्टेंबर) श्वेताच्या आईने दाखल केलेली याचिकादेखील फेटाळली आहे. या याचिकेत तिच्या आईने
आपल्या मुलीच्या कस्टडीची मागणी केली होती.