आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Kapur Brothers Celebrate Sidharth's Birthday!

PICS: सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीत पोहोचले कुटुंबीय, पत्नी विद्या बालन मात्र गैरहजर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- पत्नी शायोंतिसह कुणाल रॉय कपूर, आदित्य रॉय कपूर, आई सालोमेसह सिद्धार्थ रॉय कपूर)
मुंबई - प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांनी 2 ऑगस्ट रोजी आपला 40वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह लेट नाइट पार्टी सेलिब्रेट केली. या पार्टीत त्यांची आई सालोमे रॉय कपूर, वडील, दोन्ही भाऊ आदित्य आणि कुणाल सहभागी झाले होते.
कुटुंबीयांसह काही जवळचे मित्रसुद्धा सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले
होते. यावेळी तिघेही भाऊ जीन्स आणि ओपन शर्टमध्ये दिसले. तिघांनी ब्लू जीन्स घातला होता. सिद्धार्थ ब्लॅक शर्ट, आदित्य ब्लू शर्ट आणि कुणाल रेड शर्टमध्ये दिसले. कुणालसह त्याची पत्नी शायोंतिसुद्धा होती. या सर्वांनी एक फॅमिली पोजसुद्धा फोटोग्राफर्सना दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बर्थडे पार्टीत सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री विद्या बालन गैरहजर होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिद्धार्थच्या बर्थडे निमित्त आयोजित पार्टीत उपस्थितांची छायाचित्रे...