आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'द लिव्ह वेल डाएट\' पुस्तकाचे परेश रावल यांच्या हस्ते प्रकाशन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ आयोजित 'प्रित रसिक' या साहित्यिक महोत्सवात डॉ. सरिता डावरे व शेफ संजीव कपूर लिखित 'द लिव्ह वेल डाएट' या मराठी पुस्तक प्रकाशनाचा शानदार कार्यकम नुकताच पार पडला. हा कार्यक्रम मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ सभागृहात आयोजित केला होता. अभिनेते परेश रावल आणि गायक हरिहरन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
'प्रिय रसिक' या महोत्सवाचे यावर्षीचे हे पाचवे वर्ष असून या महोत्सवातचे पहिले पुष्प परेश रावल आणि हरिहरन यांनी गुंफले आहे. डाएट हा आपल्या आयुष्यात महत्वाचा भाग आहे असे या दोन्ही पाहूण्यानी सांगितले. अभिनेत्री स्वरुप संपत यांनी मनमोकळ्या गप्पा मारत डॉ. सरिता डावरे, शेफ संजीव कपूर आणि इतर मान्यवरांकडून त्यांच्या फिटनेसचे रहस्यही जाणून घेतले.
'देव आहे की नाही हे मला माहित नाही परंतु मी डॉ. सरिता यांच्यावर मनापासून श्रध्दा ठेवत त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो केल्यावर मला स्वत:मध्ये आमूलाग्र बदल जाणवला. जीभेवर ताबा ठेवणे हे कठिण असल्याचेही अभिनेता परेश रावल यांनी सांगितले.'
'विचार सकारात्मक असतील तर मन आणि शरीर हे दोन्ही सुदृढ राहते. डाएट ही शिक्षा नसून ती एक 'लाइफस्टाइल मॅनेजमेंट' असल्याचे डॉ. सरिता डावरे यांनी सांगितेल.' त्यानंतर हरिहरन यांनी डॉ. सरिता यांच्या डाएटचे कौतुक करत सांगितले, की 'मलाही सुरूवातीला डाएट करणे थोडे कठिण गेले परंतु डाएट केल्यानंतर जे काही घडले तो माझ्यासाठी एक चमत्कार होता.'
डाएट आणि रेसिपी यांचे एकत्रित मिश्रण असलेले पुस्तक आजपर्यंत प्रकाशित झालेले नव्हते. हे पुस्तक वाचकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा मानसही पॉप्युलर प्रकाशनाचे अध्यक्ष हर्ष भटकळ यांनी सांगितले.
केवळ रेसिपींसाठी नव्हे तर आरोग्यदायी संतुलन आहार कसा असावा यासाठीही हे पुस्तक उपयोगी आहे. 'द लिव्ह वेल डाएट' हे पुस्तक डाएटविषयीचे सर्व गैरसमज निश्चिपणे दूर करेल, कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजून सांगतेच पण त्याहूनी जास्त निरोगी आणि आनंदायी जगण्याचा संदेशही देते. हे पुस्तक मराठी प्रमाणेच इतर भाषांमध्येही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढील स्लाइड्सवर बघा या कार्यक्रमाची काही खास छायाचित्रे