आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Remake Of \'HUM\' Is Next Film Of Rohit Shetty And Shahrukh Khan

बिग बींच्या भूमिकेत SRK, रोहितसह बनवणार \'हम\'चा रिमेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हम'च्या पोस्टरवर किमी काटकर आणि अमिताभ बच्चन, उजवीकडे शाहरुख खान)
अनेक चित्रपटांचा रिमेक बनवणारा अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी आता शाहरुख खानसोबत अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट 'हम' चित्रपटाचा रिमेक घेऊन येत आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा वरुण धवन यांच्याही भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
रोहित शेट्टीने सिंघम रिटर्न्सनंतर पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत चित्रपट बनवण्याची घोषणा पूर्वीच केलेली आहे. चित्रपटाची कथा सात पडद्यांच्या आत लपवून ठेवली जात आहे, तर चेन्नई एक्स्प्रेसचा सिक्वेल बनवणार नसल्याचेही रोहितने स्पष्ट केले. सिनेसृष्टीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा नवीन चित्रपट 90च्या दशकातील सुपरहिट 'हम' चित्रपटाचा रिमेक असू शकतो. 'हम'मध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, गोविंदा, डॅनी, किमी काटकर, अनुपम खेर, अन्नू कपूर आणि दीपा साही आदींच्या प्रमुख भूमिका होत्या.
रोहितच्या चित्रपटात शाहरुखशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनदेखील असेल. निश्चितच अमिताभ यांनी साकारलेली भूमिका शाहरुख निभावेल. सिद्धार्थ रजनीकांतची अॅक्शन, तर वरुणला वडील डेव्हिड धवन यांच्या आवडत्या अभिनेता गोविंदाची भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.

नोट : शाहरुख-रोहितचा चित्रपट 'हम'वर आधारित असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कथा तीच असल्यास चित्रपटाचे निर्माते रोमेश शर्मा यांच्याकडून कॉपीराइटचे अधिकार मिळवावे लागतील. 200 कोटींचे रेकॉर्ड बनवणारा दिग्दर्शक आणि कलाकार असल्याने निश्चितच खरेदी-विक्रीचा आकडाही मोठाच राहील.
पुढे वाचा, रोहितने यापूर्वीही अनेक सिनेमांचे रिमेक बनवले आहेत...