(खान आणि शर्मा कुटुंबीय एकत्र छायाचित्रे काढून घेताना...)
मुंबईः अभिनेता
सलमान खानची बहीण अर्पिताचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी रात्री मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये पार पडले. या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीत खान कुटुंबीयांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी ताज हॉटेलच्या बाहेर येऊन खान फॅमिलीने मीडियाला पोज दिल्या. यावेळी अर्पिताचे वडील सलीम खान, भाऊ सलमान, अरबाज आणि सोहेल तिच्यासोबत होते. याशिवाय अर्पिताच्या दोन्ही वहिनी मलायका अरोरा खान आणि सीमा खान यांनीही
आपल्या कुटुंबीयांसह मीडियाला पोज दिल्या. आयुषचे आईवडील, अर्पिताची थोरली बहीण अलविरा आणि तिचे पती अतुल अग्निहोत्रीसुद्धा या फोटोसेशनवेळी हजर होते. खान कुटुंबातील बच्चेमंडळीनेसुद्धा यावेळी दिसली.
अर्पिताचे लग्न 18 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये झाले. या लग्नालासुद्धा बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिसेप्शनवेळी क्लिक झालेली खान आणि शर्मा कुटुंबीयांची खास छायाचित्रे..