('द शौकीन्स'चे पोस्टर)
मुंबईः
अक्षय कुमार स्टारर 'द शौकीन्स' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी
बॉक्स ऑफिसवर पाच कोटींचा गल्ला जमवला आहे. तसे पाहता शुक्रवारी सिनेमाला अपेक्षेप्रमाणे ओपनिंग मिळाले नाही, मात्र पाच कोटींचा गल्ला जमवण्यात सिनेमा यशस्वी ठरला.
या सिनेमात
अक्षय कुमार आणि लीसा हेडन मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्यांदाच अक्षय आणि लीसा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत. अक्षयचा यावर्षी रिलीज झालेला हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याचे हॉलिडे आणि एन्टरटेन्मेंट हे दोन सिनेमे रिलीज झाले होते.
'द शौकिन्स' हा 1982 मध्ये रिलीज झालेल्या शौकीन या सिनेमाचा रिमेक आहे. अक्षय आणि लीसासह या सिनेमात अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियुष मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हा सिनेमा अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला असून अक्षय कुमार याचा निर्माता आहे. या सिनेमाचे एकुण बजेट 35 कोटींच्या घरात आहे.