आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयने लाँच केला 'द शौकीन'चा ट्रेलर, पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या स्टारकास्टचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इव्हेंटदरम्यान अन्नू कपूर, अनुपम खेर आणि लीसा हेडन)
मुंबई: मुंबईमध्ये काल अक्षय कुमारने आगामी बॉलिवूड सिनेमा 'द शौकीन'चा ट्रेलर लाँच केला. हा सिनेमा 1982मध्ये बसु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि अशोक कुमार, उत्पल दत्त, ए के हंगल, रति अग्निहोत्री आणि मिथुन चक्रवर्ती अभिनीत 'शौकीन'चा रिमेक आहे.
7 नोव्हेंबर रोजी रिलीज होणा-या या सिनेमात अनुपम खेर, पियूष मिश्रा, अन्नू कपूर, लीसा हेडन आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिषेक शर्मा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. अश्विन वार्डे आणि मुराद खेतानी निर्मित करत आहेत. सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी याचे स्टारकास्ट आणि दिग्दर्शकांशिवाय तिग्मांशू धूलियासुध्दा दिसले.
काय आहे सिनेमाची कथा?
सिनेमा तीन जेष्ठांच्या (अनुपम खेर, पियूष मिश्रा आणि अन्नू कपूर) भोवती गुंफण्यात आली आहे. हे तिघे तरुणींचे निरिक्षण करतात. दिल्लीत ते त्यांच्या या सवयीने अडचणीत सापडतात तेव्हा ते मॉरिशसला जातात. तिथे त्यांची भेट लीसा हेडनशी होते. सिनेमात अक्षय त्याच्याच भूमिकेत आहे. लीसा अक्षयच्या पात्राशी मोठी चाहती आहे. हे तिघे जेष्ठ तिला अक्षय कुमारशी भेटवण्याचा शब्द देतात. त्यानंतर पुढे काय होत हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'द शौकीन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...