आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Tour In London Where The Biggest Bollywood Extravaganza Concluded Recently At The Houseful O2 Arena

SLAM: शाहरुख-दीपिका झाले रोमँटिक, माधुरीनेसुध्दा लावले ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डान्स करताना माधुरी दीक्षित आणि दीपिका पदुकोणसोबत शाहरुख खान)
मुंबई: शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इअर' या आगामी सिनेमाचे 'SLAM! The Tour' संपले आहे. या टूरच्या शेवटचा टप्पा लंडन होता. तिथे सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटसह टूरला ब्रेक लावण्यात आला आहे. लंडनमध्ये आयोजित झालेल्या प्रमोशन इव्हेंटची छायाचित्रे रिलीज करण्यात आली आहेत.
लंडनमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये 'हॅपी न्यू इअर'ची टीमसोबतच, माधुरी दीक्षितनेसुध्दा स्टेजवर परफॉर्मन्स दिला. माधुरीने तिच्या सिनेमांच्या अनेक गाण्यांवरसुध्दा डान्स केला.
सोबतच, शाहरुख-दीपिकाने एकत्र आणि वेगवेगळे परफॉर्मन्स दिले. सिनेमाचे इतर स्टार्स अभिषेक बच्चन, बोमण ईराणी, विवान शाह, सोनू सुद, मलायका अरोरा खाननेसुध्दा प्रेक्षकांना डान्स कूरन भूरळ घातली. या सर्वांसोबतच, सिनेमाची दिग्दर्शिका फराह खानसुध्दा डान्स करताना दिसली.
'हॅपी न्यू इअर' येत्या 24 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. सिनेमाला बंम्पर ओपनिंग देण्यासाठी प्रमोशन टूरवर शाहरुख संपूर्ण टीमसोबत गेला होता. या टूरला 19 सप्टेंबर रोजी होस्टनच्या टॉयट सेंटरपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर न्यू जर्सी, टोरंटो, शिकागो, वैंकूवर आणि सैन जोसमध्ये जाऊन सिनेमाचे प्रमोशन केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॅपी न्यू इअर'च्या टीमच्या प्रमोशनचे Pics...